समाजाप्रती वचनबद्धता: तुमचा मुलगा, तुमच्या सेवेसाठी समर्पित
पूर्ण नाव व जन्म: श्री. रवि गंगाधर राणा यांचा जन्म २८ एप्रिल १९८० रोजी भाजीबाजार, अमरावती येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडिल हमालीचे काम करुन स्वकष्टाच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबामध्ये २ बहिणी व २ भाऊ असे ६ व्यक्तींचे कुटुंब होते. कुटुंबाची परिस्थती ही अत्यंत हलाखीची होती.अशा प्रकारचे हलाखीची जिवन जगून आपल्या प्रामाणिकतेने, चिकाटीने, मेहनतीने व जिद्दीने शिक्षण पूर्ण केले तसेच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी उपलब्धी प्राप्त करुन एका हमालाचा मुलगा जनतेच्या आशिर्वादाने चौथ्यांदा आमदार झाला.
कुटुंब व वैयक्तिक जीवन: श्री. रवि राणा यांची पत्नी सौ नवनीत रवि राणा या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार आहेत. हे दांपत्य समाजसेवा व राजकारणात समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
शिक्षण: त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली व शिक्षणात नेहमीच मेहनत व सातत्य दाखवले.
राजकीय कारकीर्द: श्री. रवि राणा यांनी २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून बडनेरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि त्यानंतर २०१४, २०१९ व २०२४ असे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांचा हा विजय लोकांच्या विश्वासाचा दाखला आहे.
शेतकरीप्रेमी नेता: त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवून विविध आंदोलनांचे नेतृत्व केले. त्यांच्या या भूमिकेमुळे ते 'शेतकरी नेता' म्हणून सुद्धा ओळखले जातात.
माहितीपट
रवी गंगाधर राणा – बहुजनांचा जननायक
मनात स्वाभिमान आणि आई-वडिलांचे संस्कार असतील, तर माणूस कधीच चुकीच्या मार्गावर जात नाही—याच विचारातून माननीय आमदार श्री. रविभाऊ राणा यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी आपल्या जिद्दी, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजसेवेचा मार्ग स्वीकारला आणि युवा स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. शेतकरी, गरजू कुटुंब, महिला आणि सामान्य जनतेसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातून स्वाभिमान, संघर्ष आणि जनसेवेचा संदेश मिळतो. आज त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित “रवी गंगाधर राणा – बहुजनांचा जननायक” या चित्रपटाचा टीझर सादर करत आहोत.
स्वाभिमान गीत
पेक्षा जास्त
सक्रिय सदस्य
पेक्षा जास्त
लोट गाडी वाटप
पेक्षा जास्त
व्हीलचेअर वाटप
पेक्षा जास्त
किराणा किट वाटप
पेक्षा जास्त
रुग्णांना मदत
पेक्षा जास्त
प्रधानमंत्री आवास योजना घर
पेक्षा जास्त
बॅटरी तीन-चाकी वाहने
पेक्षा जास्त
आरोग्य शिबिरे
पेक्षा जास्त
PR कार्ड वाटप
पेक्षा जास्त
शिलाई मशीन वाटप
पेक्षा जास्त
शैक्षणिक किट वाटप
पेक्षा जास्त
साडी वाटप
विख्यात
अलीकडील आंदोलने
शेतकऱ्यांचे प्रश्न
शेतकऱ्यांसाठी आंदोलन
शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी, पीक अपयश आणि कमी उत्पन्नामुळे आत्महत्ये शिवाय पर्याय दिसत नव्हता. युवा स्वाभिमान पार्टी ने आंदोलन करून सरकारच्या लक्षात आणून दिले की शेतकऱ्यांचे जीवनमान सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पुढील शोकांतिका टाळण्यासाठी न्याय्य किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न
विद्यार्थ्यांसाठी आंदोलन
विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी, परवडणाऱ्या शुल्कासाठी आणि सुधारित सुविधांसाठी निदर्शने करत होते. ते समान संधी, न्याय आणि सुधारणा यांची मागणी करत आहेत. युवा स्वाभिमान पार्टी ने अधिकाऱ्यांना त्यांच्या चिंता दूर करून उज्ज्वल व अधिक समावेशक भविष्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले.
पाण्याचा प्रश्न
पाण्यासाठी आंदोलन
विविध समुदायांना स्वच्छ पाण्याच्या सुलभ उपलब्धतेअभावी त्रास सहन करावा लागत होता. युवा स्वाभिमान पार्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरात आंदोलन करून संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्वांना न्याय्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
कामे
समावेशक विकास कामे
प्रशस्तिपत्र
इतर लोकांची मते